मराठी साहित्या बद्दल लिहिताना प्रथमतः माऊलीची आठवण होते जेथून मराठी वाणी चा उदय झाला . ह्या लहान बाळाने माऊलीची रूप घेऊन सर्वांच्या मुखी अतिशय गोड अशी बोली ती मराठी माय बोली वसविली अशा त्या महान बाळ ब्रह्मचारी संत शिरो मणी सर्व भक्तांचे हृदय प्रिय अशा ज्ञानेश्वर माउलींना शत शत प्रणाम.
ह्या काव्य सरिता ची सुरवात त्यांच्या आठवणिने  केली . आपल्या मराठी भाषेला अनेक कवींनी सजविले आहे .अलंकार , वृत्त  यांनी अलंकृत केले आहे

ज्ञानियाच्या मुखी हि जन्मली
आमुची हि प्रिय माय बोली
संस्कृत चे हे गोंडस बालक
संस्कारानी केले पुरे सबळ

मोरोपंतांच्या यमकात वाढलेली
गोविंदाग्रजानी पूर्ण सजविलेली
तांब्यांनी  डोळ्यात रेखिले 
ठोंबरेंच्या रिमझिम पावसात भिजली

शांताबाईंनी हि लाडकी लेक
लताच्या कंठातुनी गायिली सुरेख
गदिंनी रामायणात भूषविले
दासांनी मनाचे शलोक गायिले

आणखी खूप प्रिय कवी
मनात राहिले घर करुनि
नमन सर्व  मराठी कवींना
आणि मराठी बोली प्रिय ज्यांना

सर्व G+ आपल्या मराठी कविता प्रसिद्ध करू शकता . त्या साठी सभासद व्हावे . एका दिवसाला आठ तासाच्या फरकाने २ कविता प्रसिद्ध करू शकता

 आकाशी मळा लाविला बा एक । वांझेचे बालक शिंपितस्मे !!१ । .... उर्ण तंतु दोरा जाळे केले त्यांचे डोही मृगजळाचे धरिले मच्छ ॥२ ।। नेले अंधापासी मुके बोले ... मुंगी उडाली आकाशीं । तिणे गिळिले सुर्याशी ॥१॥ थोर नवलाव जाला । वांझे पुत्र ...

Comments

Popular Posts