आठवणीतील गाणी
आठवणीतील गाणी
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
सुंदर चांदणे चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे
सुंदर हि झाडे सुंदर पाखरे
किती गोड बरे गाणे गाती
सुंदर वेलींची सुंदर हि फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी
इतुके सुंदर जग तुझे जर
किती सुंदर असशील
घाल घाल पिंगा वार्या माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात सुखी आहे पोर सांग आईच्या कानात आई भाऊसाठी परी मन खंतावतं विसरली का गं भादव्यात वर्स झालं माहेरीच्या सुखाला गं मन आसवलं फिरुन फिरुन सय येई, जीव वेडावतो चंद्रकळेचा गं शेव ओलाचिंब होतो काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार हुंगहुंगुनिया करी कशी गं बेजार परसात पारिजातकाचा सडा पडे कधी फुलं वेचायला नेशील तू गडे कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय माया माझ्यावर दाट जशी तुझी माय आले भरुन डोळे पुन्हा गळा ही दाटला माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला
Comments
Post a Comment