लाजरी वर्षा



लाजरी वर्षा

नव्या नवरी , समान ओलांडला, उंबरठा वर्षा  ने 
मनी  लाजली, पंदरा आडून , वेधून मिलनाचे गार्हाणे 

भरून आले, आकाश चहू दिशा, वाटले पाहिलं हसून  
घामाघूम होतो, विना प्रयासे  ,  प्रिये ची वाट पाहून 

लाजिर वाणी , झाली विनवणी , नाही जाणिले मनी 
व्यथा अंतरी,  दाबून धरली ,  दैव जाणिले कुणी 

भरवसा खरा , अंतरी धरला , येईल कधी कणव 
होईल कृपा,   या वर्षा ली ची  ,  होते कधी जाणीव 

चातका परी मी , शोधात असतो , मुखचंद्र मेघाचा 
क्षितिजा लागून , कुठे डोकावतो , होकार राजीचा 

करा तुम्हीही , अर्चना अंतरि , घडो रिमझिम सर्ग 
लाजने मुरडणे , अति झुरवणे , घडो वर्षा संसर्ग

Comments

Popular Posts