आठवणी
आठवणी
विरून गेल्या जुन्या आठवणी
विसरून गेले जुने सोबती
आवडती जरी मना मध्ये तरी
सारे सारे पांगले पांगले सारे सारे पांगले पांगले
आसवे उभी काठावरती
विरहाच्या डोहाकाठी
मन धावते मृगजळा मागे
सारे सारे पांगले पांगले सारे सारे पांगले पांगले
प्रतिमा अजूनही सोबत असते
माझ्यासवे तू निरंतर असते
तरी हुंदके मधूनच दाटून येती
सारे सारे पांगले पांगले सारे सारे पांगले पांगले
Comments
Post a Comment