डोळे हे जुल्मी गडे






वाचक बंधूना नमस्कार . माननीय कवीश्रेष्ठ  भा ऱा . तांबे यांची कविता " डोळे हे जुलमी गडे " सर्व श्रूत आहे. त्यांची हि  शेवटची कविता अपूर्ण अवस्थेत राहिली . कदाचित सामाजिक बंधनामुळे असेल . या कवितेतील माधुर्य मनात नेहमीच गुणगुणत राहिल. कवीशेष्टी  आपणा सर्वांची क्षमा मागून कविता पूर्ण करण्याचा पर्यंत करीत आहे.  कडवे २ ते ४ सोबत विनम्र सादर. 

डोळे हे जुल्मी गडे
 
डोळे हे जुल्मी गडे, रोखून मज पाहू नका 
जादूगिरी त्यात पुरी, येथ उभे राहू नका-----------------।।धृ ।। 

 घालू कशी कशिदा मी, होती किती सांगू चुका 
बोचे सुई फिरफिरुनी, वेळ सख्या जाय फुका 

 खळबळ किती होय मनी, हसतील मज सर्वजणी 
येतील त्या संधी बघूनी, आग उगा लावू नका
डोळे हे जुल्मी गडे .....---------------।।१।|      भा ऱा . तांबे 

गोड स्मित ओठा वरती ,धड धडते अधर किती
सांगू कुणा व्यथा हृदयी , नसे तुम्हा काय भीती ?

पदर अधरी निसटताना, सावरू किती पुन्हा पुन्हा
गोड तनी शिरी शिरवे , आता स्वप्नी येऊ नका 
डोळे हे जुल्मी गडे-----------------।।२।।
,
शिळ शूल सदा स्मरते, ऐकून तरी मनी दचकते
कुणी कधी पाहिलं जरी , हे सगळे ना वळते

मन नाही थार्या वरी  , कळवळते सांगू उरी 
धाक मज चहु कडूनि , चोरून असे भेटू नका 
डोळे हे जुल्मी गडे------------------------।।३।।

जरी मनी असले भलते ,  नकोच उगीच काय  तरी हे ?
वडील धारी आप्त असती ,  कुणी तरी पाहिल  बरे !!

जमले सूत्र तुमचेशी तर , गुण मिलन करू नका
चुकून चूक तसली घडली , वेळ तशी आणू नका 
डोळे हे जुल्मी गडे---------------------।।४।।

Comments

Popular Posts