तृष्णा

मनातील गोड प्रेमळ आर्तता  म्हणजे तृष्णा जेव्हा तुमच्याशी गुजगोष्टी करतील तर त्या अशा

 तृष्णा 

तृष्णा हि तुज साठी रे वेडी
कधी हसते , गाते , वेडावते
 तृष्णा हि तुज साठी रे वेडी

फेरे धरुनी नाच नाचले
भोवती तुज शी मनोभावने
स्मितात मज तूच गोवले
वरले मनात तुज मी

निशी दिन तूच रे मज भोवती
हसून खुणवितो सदा मजशी
काय करावे नुमजे मजला
हृदयात तूच वसशी

हुरहुरले मन तुज साठी वेड्या
प्रेमास्तव ल्याले पायघड्या
खुद्कन हसते मनी विलासते
अंतरी तुजसी वेधूनी

Comments

Popular Posts