समाज क्रान्ति

समाज क्रान्ति 
भारतीय समाज हा आता कुठे उभे राहण्याच्या प्रयत्नात आहे . तरीही मानव म्हणून जगण्याची मुभा नाही मिळाली . हाता पायाच्या बेड्या थोड्या सैल झाल्या आहेत . गती ची वाट मोकळी दिसत आहे . पण मनमोकळी हालचाल करता येत नाही . सरकारचा आणि काही सौस्थांचा तास जिकिरीचा प्रयत्न चालू आहे . पण लोणी खाणार्या माकडांना अजून समाजा पासून वेगळे करता येत नाही .

नोट बंदी योजनेतील पैशांचे ऑन लाईन हस्तांतरण शून्य गतीत आहे.  औषधाचे , किरणांचे हजारो रुपयाचे बिल कॅश ने द्यावे लागते .

खेड्या तील समाज हलाखीचे दिवस सावरत शहरात येऊन पोहोचला आहे . जगण्यासाठी आवश्यक असणारी धडपड मनाची बांधणी त्यांचे जवळ आहे . मान , अपमान , सन्मान  आणि प्रगतीचा ताळमेळ ते लीलया हाताळू शकतात .

पण शहरातील सुशिक्शित समजल्या जाणार्या पुढे अंधकार मय  जीवन असून विशिष्ट्य साच्या मधील जीवन त्यांना अपेक्षित आहे व ते ना जमल्यास अवमार्गाची वाटचाल त्यांना खुणावत आहे . शिक्षानामधून तयार होणारी स्पर्धात्मक अवहेलना पापणीच्या आतच अश्रू वाळून जात आहेत . अशी कुचंबणा आणि घरातील अल्पस्वल्प खाणारी तोंडे आ वासून समाजाकडे बावरलेल्या नजरेनं पाहात आहे .
मजुरी त्यांना शक्य नाही . कुठे छोट्या मोठ्या दुकानात मास्तर पदवी , सांभाळत साफ सफाई माल देना घेणं असे मुलकी कामे हाताळावे लागत आहे.  आणि तशात घरातील कोणताही एक व्यक्ती डिप्रेसशन च्या कचाट्यात सापडला तर ते घर संपूर्ण तहा नामशेष होत आहे . डॉक्टर त्यांना बरे करू शकत नाहीत पण कुत्रा मांजर पेक्षा खालील जीवन जगण्यास भाग पाडत आहे.

गरज आहे चांगल्या मार्गाने दोन पैसे हातात खेळण्याची जेणे करून ३ व्यक्तीचा ( पती, पत्नी ,अपत्य ) सन्मान निय उदर निर्वाह करू शकेल 

एकत्र कुटुंब पद्धतीची होणारी मोडतोड ह्या असल्या समाज घडणीने वेगळ्या पद्धतीने उभारणी होत आहे. मुलीच्या सुखासाठी होणारी धडपड हुंड्याचे रूपांतर जवायचे पालन पोषण अशी कुतर तोड करणारी पद्धत उभारली जात आहे . स्त्रीला अपमानास्पद वागणूक देणे अजून कमी झालेले नाही .
शालेय शिक्षणात मानसशास्त्र प्रमाणे वागण्याची पद्धत योग्य शब्दांचा वयाप्रमाणे वापर करणे शिकवणे गरजेचे आहे.  
शिक्षणात मुलींची होणारी प्रगती पण समाजाकडून बहिष्क्रुत करणारी व्यवहारात वावरणे धोकादायक रचना निर्माण करीत असून अप्रतिष्टित प्रगतीचे मार्ग मोकळे करीत आहे. मुलीने घर्तलेल्या शिक्षणाचा योग्य  परतावा समाजाच्या दृष्टिकोनामुळे मिळू शकत नाही .   उंचच शिक्षित महिला किरकोळ खर्च भाजण्यासाठी नोकरी करतात 
गोंधळ लेला मुलगा हे आवाहन स्वीकारण्याच्या मनस्थितीत येऊ शकत नाही . पूर्वापार चालत आलेली सकुटुंबाची अश्याप्रकारे जबाबदारी सांबाळने त्याला शिक्षणात प्रगती करायला घातक होत आहे. 

शिक्षण घेणं हा प्रत्यक्ष व्यक्तीचा अधिकार जरी असला तरी समाजाची आणि देशाची गरज आहे. म्हणून शिक्षण मोफत असावे

Comments

Popular Posts