फुल अन कळी
कळी फुलली
फुलून खुलली
खुलून हसली
हसून भाळली
फुल: " काय बाई तुझी दशा
काय वर्णावी तुझी नशा "
कळी :
"नशा प्रीतीची
प्रीत माझी
माझी अन त्याची
त्याची अन माझी
काय बाई तुम्ही अशा
उगीच डीवचता वेळी अशा"
फुल :
"वेडा बाई
वाइच घाई
घाईत कशी नाही
नाही म्हणे बाई
ठसली त्याच्या मनिखरी
तूच डीवसली त्याच्या उरी "
कळी:
" लाज थोडीशी
थोडी का बोलशी
बोलुनी म्हणवीशी
म्हणे झुरशी
डीवसली मी ? मी नाही गडे दोषी
दुखते हृदयी प्रीत जराशी "
फुल :
" तेच ते
ते म्हणते
म्हणून सांगते
सांगू कसे ते
विरह जराही असह्य होते
याद सारखी मनी गुणगुणते "
कळी :
"ध्यास मना
मनात जिरेना
जीरून उरेना
उरून पुरेना
हूर हूर मना सदा लागते
तरीच दुखते प्रीत जराते "
Comments
Post a Comment