गंध प्रितीचा -------------(A)
गंध प्रितीचा
प्रितीचा गंध नाही तुला
परी गंध तुज जवळी प्रितीचा
तुझीच धुंद नाही तुला
परी तुजवरी धुंद कोण हा ! ?
दडपण नाही कुणाचे तुला
परी का लाजते तू दर्पणा ?
कर्ण फुले हिंदोळती सारखी
पुन्हा पुन्हा चुंबिती गाली का ?
पुनवेचा धवल चंद्रमा
का मागतो आसरा मेघा ?
बघता कधीतरी तुला एकटे
परी का ग्रासते खळी गाला ?
दृष्टी टाळता न पुसे तुला
तर काय शोधिशी हृदयी ह्या
Comments
Post a Comment