प्रतीक्षित -----------(A)
प्रतीक्षित
बघता दिसले हास्य कोवळे
गाली उधळून तेजा लाजवून
प्रीत पाकळ्या ओंजळीत घेऊन
कल्पतरू च्या कळ्या वेचून
पद कोमल ते दबकत ठेवून
धरती वरती अलगत उतरून
तारुण्याचे बहार विखरून
अंगावरती अमृत झेलून
मुसमुसलेल्या तनु भोवती
प्रीत गंध दरवडे सभोवती
गमे उतरली सुंदर अप्सरा
लेण्यातीला कुणी गर्विता
मेघाजिच्या कडे वरची
चंचल बाला परी शोभती
असे लावण्य सुंदर लाभले
वर्गात अन शेजारी प्रवेशले
Comments
Post a Comment