मन कवळी
असच असत , काहीच माहित नसत
मन कुणासाठी तरी हुरहुरत असत
हरवलय काहीतरी अस जाणवत
काळजाच्या काठावर वाट पाहात राहात
येशील कधी प्रिया तू
नयन माझे थकले रे
हि वाट दूर दूर जाते परी
मी मोहात तुझ्या अडकले रे
भेटशील कधी सांग मला
जीव झाला बघ वेडा पिसा
दूरध्वनी वर तरी बोल ना
शब्द ऐकण्या कि कातावला
का रुष्ट असेल मजवरी तू
का असेल माझा भ्रम फुका
मन चीन्तते भलते आता
सत्य काय नुमजे मला
लावलीस माया मज वेडीला
जाणुनी माझ्या ह्रुदय कला
सुरूप नसुनी म्हणतोस मला
दिसतेस जणू कि अप्सरा
Comments
Post a Comment