ये ना भेट या हृदयाला


 ये ना भेट या हृदयाला 

डोळ्यात तुझ्या मी पाहतो 
प्रेमाची अतीव उत्कंठा 
हरूवून त्यात जातो 
शोधत तुझ्या खंता 

डोहात बुडून  गेल्या परी 
असे माझे मन झालेले 
सांग तरी मज तू 
असे चूक ते काय घडले 

हृदय कासावीस झाले 
ऐकण्या तुजी वाणी 
खरेच तू भावलीस  मला
दुजी नाही मनात कोणी 

न बोलता तू बोलतेस किती 
मन माझे विच्छिन्न झाले 
ये ना भेट या हृदयाला 
आकंठ प्रीतत ते झुरले
 

Comments

Popular Posts