ह्या जीवनाला
ह्या जीवनाला
जीवघेण्या ह्या जीवनाला
असेच हसत खेळत हाताळावे
दुःखाचे सुद्धा त्याला
सुन्दर खेळणेच वाटावे
अश्रुंना त्याची चाहूल
कशी खोडकर वाटावी
कधी लपंडाव आणि कधी
गट्टी फु शी मिसळण व्हावी
ही अशी कला ह्या जीवनी
सरमिसळ करून जगावे
कि काळाला हि हेवा वाटावा
मनुष्य जन्म घेउनि बघावे
Comments
Post a Comment