मुसाफिर
गात गात एक वेड गाणे आवाज कुणाचा गुणगुणे
सूर नसे त्या गाण्याला अर्थ परी त्या शब्दाला
ध्यान न त्याचे कोणा वरती एकटाच तो पाठ हि काती
पाउल वाटे तो चालला पुढे काय क्षिती न त्याला
झपझप त्याचे पाउल वाजे गाठोडे ते पाठीवर साजे
तमा न त्याला गाठोड्या ची अन बेसूर त्या सुराची
अवचित तेथे ललना जाती भान न राहून जाई मधुनी
कुणी कुणाचा या जगती
Comments
Post a Comment