शब्दांचे पांघरून
फीके पडले माझ्या शब्दांचे पांघरून
तुझ्या भावनांना नाही सामाऊ शकलो
पण हृदयात खोलखोल पोकळी मात्र होती
तुझ्या प्रेमाची आंस भरून यायची होती
अश्रूंच्या ओंजळीत , हुंदका च्या लाटात
मी स्वताला हरवून बसलोय, ये ना प्रिये
हृदयातील त्या कोमल तेशी
मिसळून घे मजशी
प्रिये घे ना हृदयाशी
नाही पुसल्या जात आठवणी
पाला पाचोळा सारख्या उडू लागतात
हळुवार फुंकरीने सुध्दा
नाही धरून ठेवता येत सार काही
हृदयाच्या कोंडवाड्यात
भिरभिरत पुन्हा येतात परत
जखमेला सांभाळत
वौच मन झलोय मी
सगळ्यांचे हिरमुसले चेहरे
जाणतो मी
Comments
Post a Comment