ये लवकरि
नको झुरुस तू अशी
येणार सखा, येणार सखा
घेईन तुज कुशी
हि वाट थांबलेली
वहिवाट चाललेली
पाणावलेल्या नयनांनी अशी
नको वाट पाहूस तू अशी
घाल मेल जीवाची
अन उर धडधड तो हा
कधी उन सावल्यांना
दबकून होते जीवा
दूर दूर लांब तिथे
दिसते कुणी येताना
असला सखा खरे तर
मिळेल उसंत मनाला
का चुकला असेल कोठे
पाउल वाट भलती कडे हि
नाच होईल तसे कधीही
प्रीती फक्त तुज वरती
Comments
Post a Comment