वेडी आठवण
वेडी आठवण
विरून गेल्या पाउल वाटा
हरवून गेली सारी साठवण
दूर दूर हि अजून स्मरते
अश्रू आणि तुझी वेडी आठवण
नकोस येऊ स्वप्नात माझ्या
विरहाच्या काठावरती
असलो जरी मी एकटा तिथे
साद नको मज देऊ स्वप्नात हि
आठवणींच्या पाशातील गुंता
हळुवार शब्दांच मोहमयी जाळ
नाही सुटू शकत प्रेमातून तुझ्या
आकंठ हव होत तुझ प्रेम सगळ
तुझ्या गालावरील खळीत गुंतलेल
लोभस वाण स्मित बघत राहायचं
पण आठवणींच हे वादळ सार
तुझ्या सुखासाठी असच जगायचं
Comments
Post a Comment