विसरलीस का


विसरलीस

विसरलीस का रुसलीस 
ना कळे मला रागावलीस 
पाझरती खडक डोंगरी 
तू अशी कशी विसरलीस 

भटकतो मी विरहात तुझ्या 
रानो रानी अन कपारी 
अश्रूंना  वाट करुनी 
ना दिसे कुणा पाणी नयनी 

हवीस मला तू हवीस मला 
जवळी माझ्या सोबतीला 
हृदयाच्या कुशीत लपऊनि 
तुजसंगे गुजगोष्टी करायला

Comments

Popular Posts