प्रीतीत तुझ्या
प्रीतीत तुझ्या
प्रीतीत तुझ्या हरवलो मी
नाही कसे उमजले
श्वासात श्वास गुंफुनी
भान नाही राहिले
पुनवेच्या चंद्रा सम
जणू मज भासली
चांदण्यात भिजून चिंब
सोबत हसत चीम्बली
अर्धशतक कसे उलटले
बाहूत नाही कळले
हर एक क्षण देतसे मला
भिजून प्रेमात नुमजले
पावसात तुला पाहिले
रिमझिम सरीत भिजताना
चीम्बलीस पुरते पणी
थेंब थेम्बशि चुम्बताना
असुनी जवळी येशी स्वप्नात
खेळ काय चाललासे
नको नको म्हणत उरते
अदमेला मज करतसे
रमलीस तू स्वप्नात माझ्या
हसण्यात दंग राहिलीस
डिवचून मज सारखे
खळीत गोडी विसरलीस
Comments
Post a Comment