दरी
दरी
दु:खाची नशा येते ----------------फार हळू हळू
आणि पाजली जाते अशी कि ----कुणाला नये कळू
गोठलेल्या अश्रूंच्या पेल्यात ,प्रसंगाच्या सोडयांत
वणवण त्या जीवनाची , कि ती जातांना नये कळू ?
सवय करावी लागत नाही ती कोपर्यात घ्यायची नाही
देणार्या समाजाला घेणार्या स्वत:ला नये कळू
नाही
जे साठवितात मुलांसाठी ,त्याच्याही होऊ घातलेल्या ,
वाट्याला नये कुणाच्या हि कि ज्या चमत्काराकडे
पाहावे लागते बिलकुल हळू हळू हळू
त्यांना म्हणावे लागते साम्यवाद येत आहे
त्याचे आगमन पुढे ढकलायचे आहे
त्याना भयानक वाटणारे
जे आगमन काळालाही
कळायचे नाही , कळायचे नाही , मुली येतांना
समाज वृक्षाची पाने , आता लागली सळ सळू
वारा वाहात आहे ,त्या दारिद्राच्या------- दरीतून
बाजूला उभे आहेत संपत्तीचे , व दूर ढकलू पाहाणारे
राजकारणाचे-----जुळे डोंगर
कि ते मोठे होताहेत ,
मोठी होईल दरी,जास्त येईल तुफान,
हे कुणालाही का नये कळू
Comments
Post a Comment