येशील का साथला
येशील का साथला
उभ्या ओळीत --येशील का साथ घेऊन चुम्बनांना प्रिया
( एका मित्रांने १९८१ साली वरील ओळ देऊन अद्याक्षरची त्वरित कविता करावयास सांगितली होती आणि गर्भित अर्थ समाविष्ट असावा )
ये ती आठवणी
शि ळ घालूनी मनी
ल पेटूनी स्वप्नात
का रुसलीस सजणी
सां ज सजली गाली
थ र थर ओठावरी
ला डक्या रागांत
घे ई ठाव अंतरी
उ सने भाव सुंदर
न टवी मुखमंडळ
चुं बना कोंडूनी खळीत
बं दी केलेस सबळ
ना ना योजना पाहूनी
ना ही कसे म्हणावे
प्री तीची फळफळली परे
या परी काय करावे
Comments
Post a Comment