कुणीतरी असाव
कुणीतरी असाव
गालातल्या गालात हसणार
भरलेच डोळे कधी , तर ओल असताना पुसणार
कुणी तरी असाव
पैलतीरी साद घालणार
शब्दांना कानात साठवून , गोड प्रतिसाद देणार
कुणी तरी असावे
चांदण्याच्या बरोबर नेणार ,
अंधारलेल्या वाटेत आपल्या बरोबर येणार
कुणी तरी असावे
फुला सारख फुलणार
फुलता फुलता सुगंधा सारख दरवळणार
कुणी तरी असावे
आपल्या मनात रमणार
पलीकडील किनार्या वरून , आपली वात पहाणार
अनामिका
Comments
Post a Comment