दिसते तसे नसते




  दिसते तसे नसते
चांदणे उजवे कि तव तनु -----------मज प्रश्न पडे
चंद्र हाच कि वेगळा ----------- असे अजूनही कोडे
भ्रांती ? भ्रमती ? कि प्रेमेती ? ---मनीस पडे साकडे
परी स्वप्नांत , हाच दृष्टांत -----हेच ते, नसे वेगळे

  caught in act

प्रेमळ जरी नसले हृदय ते
मृगजळात तसे भासते
मन थकले तृष्णा पिउनी पिउनी
मृगयेत काय साधते ?

असती जरी ते गाल गोबरे
खळीने अजून साजरे
परी नागीण वसे त्या हृदयी
जरी मुखी भाव लाजरे

नयनांत दिसली हाक ओढीची
अश्रू सवे फसवी
शिल्प नव्हेतर काय वेगळे
भाव गिरविले मानवी

Comments

Popular Posts