तुज बघुनी
तुज बघुनी
भाग्य पुन्हा फुलले , झुलले, अंतरी हसले
फिकीर जीवा लागली, उमजली साजणी
तू सजुनी अवतरली
फडफडले प्रीती पंख , हृदयात हर्षून उन्मादांत
शहारलो रोमांत
वैरागी बनले प्रीतम, तुज विण , वणवण भटकले
नयन थकले
वर्णू कसा हा मोद , प्रेमांध ,न पुरती पाने
तोडूनही राणे
निरभ्र मनी मी, उर्मी कोवळे उन पडले
तव तेजा मुळे
विपरीत अल्पही , मनांत भ्रमण नाही
प्रीती वाट पाही
Comments
Post a Comment