ओष्ठ
हे वर्णन मित्राशी गप्पा गोष्टी करतांना , अबोल, परिचित, आकर्षक वर्ग मैत्रिणीचे बाजूच्या घोलाक्यातील बोलके भाव दर्शन
ओष्ठ
काय असे हे , मज न कळे, ओष्टातील मधुरता
गुदमरण्या विण , न जमे मजसी , हळूच विलगता
स्मित लहरी , गाली विहरता ,मन भासे खुलले
अर्धोन्मिलित , कळी जणू कि , गाला मधून फुले
अहा ! विधाते , ठेवण हि , कोमल कमलादपि
हनवटी वरती, गमे विराजति , हळूच गालातुनी
ओठ लाजता , पळपळ विरहे, मन पुरते विव्हळले
शब्द अपुरे , त्या वर्णाया, कुठे ते ओघळले
लावण्यातील गहिरेपण ते, भरले पुरे ओठी
आनंदे स्पर्शी, तनी लागता, पुरते फुलून जाती
खिन्न मनातील , विषण्यतेस ते पळात घालवती
हर्षून अंतरी , स्वाद उरता , धवल मने होती
=====================
लेण्यातील लावण्य
कलंक मनीचे वाढवी , पद्य ते, तुज भोवती करुनी
विटाळले मन जरी, विषय नसे, तृषा बुरी धरुनी
वंचित असता , लक्षा पासुनी , न वाटे त्याचे तसे
प्रीती नसे परी, कुणा दुजीवरी , लावण्य दृष्टी असे
एकांगी परी नजर घातकी , नुमजे कुणा तिरकी
चाखून सोंदर्य जगीचे नेत्री , त्यात उणे नसे कि
अपक्व तू असे , कळी कोवळी , असे मनी सोयरे
सत्व परी भरले कुठूनसे , देही गुणी साजरे
निश्चल मनी मी, उभा ठाकसे, बघता तुज नयनी
त्यजुनि काळज्या , व्यग्र होतसे, मूर्ती मनी धरुनी
Comments
Post a Comment