महागाई
महागाई
जय देवी देई जीविताची ग्वाही नमन तुला
ओवाळिले , पंचारती घेउनि झाले जन नागवे
रोडविले , कित्येक बलशाली भले तुज पुढती
पाचोळा, गेला उडत तव फुकारीला नमन तुला
स्वातंत्र्या , स्वाहिले कैकांनी प्राणाला भवितव्या ते
हाय इस्वरा, तुजला पुजिले पुण्याइला भोग पहा
कलियुग खरे गमते आता अवतरले या जन्म भूमी
शोषण हे, पुरे कर गे बाई आवर महागाई
हवेत किती , सबळ बळी पुढे नमती काप गळे
हाताव ती , सटवी गरिबी जाती या देशा
हडकुळे ,करुनी तुजला काय मिले सकसान्न
कर दोन्ही ,जोडूनी तुजला आम्ही माना नामावितो
आणखी असे , बाकी काय गे राहते तूच पहा
Comments
Post a Comment