अडाणी




                   अडाणी

मी कोण असा हा खास तुम्हासी सांगे
कणव मनीची उचंबळून हि जागे
         ना थोर पुढारी ,अवतारी ना पुजारी
         सज्जनासमहि न गुण आचारही
माणूस म्हणूनही , न पुरते गुणही , दोष सगळे
मेणाचे हि हृदय पावले , जागे असे तेवढे
         न कृती होई करी , जे मंथन होय मनी
        जीवनी हि बरी, बावळी , न हाले कुठे जनी
लेखणी करी वळवले तेवढी , स्पुर्तीस करून मोकळे
म्हणा तुम्ही जरी कवी अथवा एक मन कवडे
=============

अस
जे नाही हो आपुले, व्यर्थ त्यासी ना झिजावे
कोप न आणावा , कल्पून भ्रामक कल्पना
देईन साथ जेही , जे निस्वार्थी केलेही
जे नाही कुणाचे त्यासी का व्याकुलालासे
हरएक जनापाशी, असे आरसा मनासी
पाहा तरी डोकावून आपण कोण असे

जाणले उणे पण , तू ह्या हृदयी
म्हणून सजाही , दिलीस का रे ---------------
भासते असे, उगाच ह्या मना
असेल तू हि , कोठे तरी लपून -------------
कोप कुणाचे, ल्यालो मी शिरी
तुज नाही सबुरी, शिक्षा दिली -----------
विनविले कितीदा,तुजला मनस्वी
होईन तपस्वी,सदा करिता ----------------


Comments

Popular Posts