नर्तकीस
नर्तकीस
कनक नार तू, छनक पायल ,घालूनी पदी ते
करी नैपथ्य , नख धरुनी, नयन कोरीते
हरिणी परी , उचली पाउले ,मधुर घुंगर वाजविते
विलोल नेत्र , रोखुनी तिरके, करी घायाळ जनाते
करकटी लेउनि , पद ते चंचल ,तनु तरी थरथर ते
हर्ष दाबुनी , मनी लाजते , तरी लाली गाली उठते
हळूच लचका , देउनि तनुस तू, परी का विव्हळते
स्पर्षूनी भुलते , नजर चोरटी , तरी का बावरते
================================== धृ--तुज परी होई मी बावरी , प्रीतम --
छनन छन ती वाजती नुपुरे
पायी पैंजण मजसी न पुरे
प्रीती आग तुज कशी रे वदू मी
होय लाही नुरे चंचल मनी मी
मज नाही अता पळभर सबुरी
विळख्यात प्रीतीच्या दे सुख तू तरी
नयनी तुज देखुनि होतसे
हर्षुनी तन्मनी तरी बावरते
पुलकित या स्वैर मनाला
तू मिठीत तरी समावरे
Comments
Post a Comment