आमुची मराठी






आमुची मराठी

ज्ञानाचीया पोटी  जन्मली मराठी 
गीतेचे भाषांतर आमुची ज्ञानेस्वरी
जडण घडण शब्द आणि उच्चाराला 
संस्कृत च्या वळणावर आमुची मराठी 

मोरोपंत यमकी बहु कवी असती
त्यांनी सजविली आमुची मराठी 
गोविंदाग्रज आगळे मराठीचे लेकरू 
देऊनी  नाटके आणि  कवितेचे तरु  

विनायक, बालकवी ,कुसुमाग्रज, केशव सुत 
आणिक असती बहु , होते मराठीशी सुत 
नमन संतजना करुनिया अभंग 
 
अशी आमुची मराठी राहील सदा अभंग

Comments

Popular Posts