रुपदा



रुपदा

सांग कानने या धरणी  वरती     
असतील काजुनी रत्न तुजशी 
अवचित अवखळ भाव उमलती 
नयन मनोहर सारे टिपती 

विलोल उर हे स्पुरुनी फुलले 
हळवे भावही मनी उमलले 
तुला न लागे प्रीत जरी ती 
कुणास नको ती प्रीतांकुर्ती 

सांग नारी गे उगाच लाजुनी 
आणिक काय त करशी सजवूनी 
सिह कटी  तव भर लेउनि 
सजली रुपदा  नूर लेउनि 

अति साठवण प्रीत कण कण 
नसेल का ते भरले प्रीत मन 
तरीच फुलले वक्ष गोजिरे 
अर्ध गोल हि तरीच घोटले 

अहा त्याचे रुप  मनोहर
पहा तरी ते प्रीत आगर 
हाय गवसले काय हे मजला 
नकळे  तत्पर सत्वर मजला

 
 


Comments

Popular Posts