वर्षाव प्रीतीचा
वर्षाव प्रीतीचा
हवेत तुजला , नको किती ते प्रीतीचे देणे
लाजण्या वीण , नुरेल तुजशी इश्य अय्या म्हणणे
नजरेतून हि, तीर सुटती संधान मज धरुनी
घायाळ मी , होतसे कितीदा तुज काय वदू मी
गालावरली, खळी बिलंदर हर हसण्या उमलते
ओठही तिजला , साथ देती मज नुमजेसे होते
अन्यायाशी, हरून लढणे नच मज परवडते
संधी मिळता , बघेन तुजशी लुटेन अमृत पुरते
आठवते का तुज , नटणे मुरडणे महागात किती पडते
आयुष्याशी , जोडून मजशी मधुमेहा परी नेते
Comments
Post a Comment