रोष प्रीतीस्तव




         रो   प्रीतीस्तव 

परिपूर्ण मुखचंद्र तव अति सुंदर ललने 
मोहमयी भासे मम मानसी प्रखर हे कानने 

 
       
रा पुससी स्मरूनी हृदयी मज कदापीही 
        ना मधुर प्रणय तुजसवे घडला अद्यापही 

 
कवण प्रीतीची नार अससी नाकळे मजला 
विरागही भरला हृदयी ना आकळे तुजला

 
        प्रीत प्रतिमा आरंभीही लाविली कश्यास्तव 
        मम दृढ हृदयी ते मूर्त केवळ असे प्रीतीस्तव 

 
ना करील भाषण तुजसवे कृपण तू मानसी 
हा राग, मनी उद्वेग, तुज पासुनी उद्भावालासी 

 
       जरी आवडशी मम हृदयांतरी कोमल प्रिये 
       तुज गंध नसे , तर रंग कुठे, हे  भ्रमिस्ठे 

 
अज्ञान जाणूनी मिळशी गळा अन आकंठ चुम्बीशी 
तंग मनाला, दंग  करुनी, पुन्हा पुन्हा कवटाळीशी 

 
        हा राग मनीचा रोग ना आवारे मजला 
       का शिष्ट , मनी तू दुष्ट अजून भासते मजला 

 
आठव तरी , कितीतरी , तुज भोवती रमलो

 प्रीत अशीकशी ,पुरी अधाशी, तुजसवे विहरलो 

copyright@chandrakant, dt27/5/2015 

एका मुलीचा हैप्पी बिर्थ डे 
द्या धब्बक लाडू पाठी मध्ये 
चीम्कोरी काढा हळूच चीटूकली 
पकडेल तर म्हणा ठमुकली 

रागाशी तिची मैत्री फार 
रुसून बसते वार वार 
रुसलेली तरी सुंदर दिसते 
गाल फुगलेली अजून आवडते 

नाक  मुरडते वारंवार 
लटका राग दाखवते फार 
स्वताशी भारी भरते 
मधूनच गोड हसते 

डोळे तिचे पाणी दार 
सफरचंदी फुगलेले गाल 
नाक असले जरी चाफेकळी 
शेंड्यावर असे भाडेकरी

वाटते तिला मोठी झाली 
माझ्यासाठी लहानच राहिली
सगळ्याची लाडाची भारी 
अशी आहे आमुची ठमुकली

Comments

Popular Posts