तार्किक सतर्क साधना

 तार्किक सतर्क साधना 


                                आ-१ हरिणाची तत्परता वरील चित्रावरून दिसून येते .

                        हि सावध अवस्थेचे गुणधर्म तर्काने अनुभव घेण्याची साधना रुपी प्रयोग आहे . जंगलातल्या  पाणवठ्यावर हिस्त्र स्वापदांचा मोकळे पणे  वावर असतो. हरीण व छोटे प्राणी खूप सावध राहून तेथे पाणी पितात . त्यांचे पूर्ण शरीर उडी घेण्याच्या सावध स्थितीत तयार असते . जरा कोठे थोडासाही  आवाज आला तरी पटकन लांब उडी घेउन  पसार होतात. हरिणाची हि सावध स्थिती येथे वापरायची आहे.

                                    त्यासाठी आपण पूर्ण चपळ खेडाळू आहात अशी कल्पना करा. त्या  प्रमाणे हालचाली व श्वास  घेण्याची क्रिया शिस्तशीर  करा. नियमाच्या बंधनात तन मनाला  बांधा . यम   म्हणजे मनाने पाळावयाचे बंधनं व नियम म्हणजे शरीराने पाळावयाचे बंधनं   ह्या ढोबळ व्याख्या समजा.



स्नायुंना सांध्यांशी असलेला घट्ट पणा जाणवू द्या. 

सर्व ज्ञानेंद्रिये टवकारले ल्या  (attentive ) अवस्थेत ठेवा . 

श्वास  खोलवर पूर्ण घ्या.पाठीचा  कणा ताठ ठेवा.  


आपले सर्व ज्ञानेंद्रिये पूर्ण चैतन्यशील असून निसर्गातिल शक्ती घेण्यास तत्पर आणि आतुर आहे अशी कल्पना करा.


 प्रत्येक श्वास  गणिक चैतन्य उर्जा शरीरात सामावीत आहे. 


प्रकाशातील विविध रंगा सहित चैतन्य शक्ती सर्व दिशांनी माझ्या कडे आकर्षित होउन डोळ्यांमधून मिळत आहे व  वाढत आहे अशी कल्पना करा.


डोळ्यांची बुबुळे जास्त प्रमाणात निसर्ग शक्ती खेचून घेऊ शकतात . 

 हवेचा आल्हाद स्पर्श आणि वेगवेगळे सुगंध माझ्या त्वचेला व ज्ञानेन्द्रीयाला  स्पर्श करीत आहे आणि माझी आंतरिक शक्ती वाढत आहे. 


सुगंधाची कल्पना करून खोल स्वास घ्या व तन मनाच्या टवटवीत पणात  भर घाला. 



                             याप्रमाणे सर्व दिशांनी वेगवेगळ्या ज्ञानेंद्रिया द्वारे स्फूर्ती  , चैतन्य , टवटवीत पणा व  तेजस्विता वाढत आहे. अशा  अवस्थेत ५ ते १० मिनिटे राहा.
                               दिवसातून आठवण  येईल तेव्हा हि साधना करू शकता. या साधनेने शरीराचे चापल्य वाढून नव चैतन्य प्राप्त होइल व तुमची इछाशक्ति (will power ) वाढून तुम्हाला अनारोग्यापासून  दूर ठेवेल   .

Comments

Popular Posts