हे सूत्र ना आकळे
हे सूत्र ना आकळे
अधरा वरती धरुनी पदरा
कोसा परी खोसुनी कमरा
उभार भार तरी ना लपले दिमाख दावी ना कळे
आरसा लेउनि करी नखरा
मुरखा मारुनी दावी चेहरा
रुसली मनी, ते दिसले दिमाख दावी ना कले
प्रीती असे जरी मज वरती
नयन चोरुनी आडुनी बघती
नकळत सारे कि बघितले दिमाख दावी ना कळे
नाक मुरडून झाले कितीदा
मी असे ह्या लकबीवर फिदा
तरी अजुनी नाही उमजले दिमाख दावी ना कळे
आदळ आपट करून दावते
लक्ष परी माझे वेधते
दिवे बाजूचे सारे विझले दिमाख दावी ना कळे
विलोल डोळ्यात रागीट बुबुळे
---- ----- परी भासे थोडे
लाल पडदा नाही गावले -----
Comments
Post a Comment