नको रे रुसू
नको रे रुसू
नव्हते मजला, कळले तेव्हा तुझ्या अंतरीच्या भावना.
कळवळते मन, बघून तुजला ,असे एकटे विहरतांना
वाटते थोडे , वळून बघावे तू , जरा थोडे इकडे
माफ केले , नाही वाटते, अजून मज ना कळे
घाल मेल हि, हृदयातील, कशी वदू तुला मी
अश्रूंची सभा, मनी दाटली, कशी सावरू अता मी
जरा चुकले , तुला ना भेटले, का त्याची सजा हि
माफ करना , अता तरीही , झाले मनी राजीही
मनी वगळता, सगळे सरले, असे कधी होते का ?
जाशील कधी, या वाटेवरून , आठव तरी येईल का ?
नको रे रुसू असा, बघ ना तरी , जरा इकडे वळूनी
तुलाच स्मरते वेंधळ्या परी मी, खरे असे ते आतुनी
Comments
Post a Comment