जीवनाचा नऊ रसाशी संबंध - भाग १




जीवनाचा नऊ  रसाशी संबंध - भाग १ 


जीवनाचा नऊ  रसाशी संबंध - भाग १ 

रस ९ प्रकारचे आहेत.  याचा वापर नृत्य कलेत   आढळतो . वेगवेगळ्या प्रकारच्या भावना चेहऱ्यावर  तसेच शरीराच्या हालचालीने दर्शविल्या जातात . ह्या नऊ रसाची व्यावहारिक  व्याप्ती खालील दिल्या प्रमाणे असू शकेल असे वाटते . या पलीकडे हास्य क्लब मध्ये फक्त हास्य रसाचा चाणाक्ष पद्धतीने वापर आढळतो .
             नऊ रसाचा वापर नृत्यामध्ये मुद्रेच्या स्वरूपात चेहर्या वरील भाव  शरीराच्या हालचालीने दाखविला जातो . राधाकृष्ण नृत्य , शंकराचे तांडव नृत्य , रामलीला, महिषासुर वध् नृत्या मध्ये भाव प्रदर्शानात  नऊ रसांचा वापर करताना दिसतो
     




           वास्तविक रस तयार होणे एक routine आहे.  विशिष्ट मर्यादे पर्यंत ते तयार  व्हायलाच पाहिजे 
नऊ रस खालील प्रमाणे आहेत .


१)     कारुण्य रस 


२)     शांत रस  


३)     अदभुत रस  


४)     शृंगार रस


५)     हास्य रस


६)     वीर रस   


७)     भयानक रस  


८)     बिभत्स रस. 


९)     रौद्र रस


                   भावनेच्या प्रकाराप्रमाणे हे  रस शरीरात  तयार होतात आणि विवक्षित  काळापुरता  मनावर ताबा मिळवतात . तुमची इच्छा  नसतांना जीवनात हे  घडत असते व तुम्ही हे टाळू शकत  नाही . उदा : तुम्ही वीर रसपूर्ण गाणे ऐकत असाल  तर शरीरात वीरश्री संचारते व बराच काल पर्यंत वीरश्रीची खुमखुमी उतरत नाही.

          तसेच काही व्यक्ती वर रौद्ररूप चढ ल्यावर २-३ दिवस उतरत नाहि व त्यांनाहि ती अवस्था खूप अडचणीची होते.

           त्याच प्रमाणे कारुण्यारसा  बद्दल सांगता येइल. एखाद्या  घरावर  दुखः दाई प्रसंग आला तर कारुण्य रसाचे प्राबल्य कमी करता येत नाहि. अनेक दिवस कारुण्य रसाचे ढग पावसाची  झडी लागल्या प्रमाणे थांबून  राहतात.

इतर रसाची त्रीव्रता कमी असते. ते  मनाला जास्त व्यग्र करीत नाहि.

             हे  रस येउन  जातात तोपर्यंत ठीक पण एखाद्या रसाचे वर्चस्व वाढले तर खूप त्रासदायक होइल.  एखाद्या रसाने मुक्कामच  करायचा म्हटला तर पूर्ण आयुष्याची  दिशा बदलून जाइल. नैराशात गुरफटलेले कित्येक जण कानाकोपर्यात जीवन कंठत असतात. कुणाला काय हो त्याचे व्यथा ह्या लागल्या जिवा.

 काळीज हा शब्द आपण ऐकला असेल ,  हृदय  म्हणजे काळीज नव्हे. भीती जेथे जाणवते, पोटात गोळा येतो   म्हणतात , दु:ख जेथे जाणवते , विरह जेथे असह्य होत, हूर हूर वाटल्याने करमत नाहीसे होते ती जागा  काळजाची असावी . स्वास पटलाच्या ( diaphragm)  ठिकाणी  बहुतेक काळजाची जागा असावे. (  आणि ते software स्वरूपात असावे)। एखाद्या वेळेस रवि चक्राची जागा सुद्धा दर्शविता येईल
         
एखाद्या  वेळेस रसाचा मुक्काम  राहिला किवा मनावर सारखे आघात होऊन ते अशक्त झाले तर  संलग्न  रस कायम स्वरूपी  थांबून  राहू शकतो    . Chemical लोच्या हा नवीन शब्द प्रयोग त्या अनुशंघाने रूढ  झाल्या सारखे   वाटते  .
        काळीज  हे एखाद्या भांडया प्रमाणे कल्पना करावयास हरकत नाही .  अहंकाराची अवहेलना झाल्याने , मनावर वाढलेल्या दबावामुळे प्रतिक्रियेच्या रूपाने ज्या क्रिया व्हायला पाहिजेत त्या न झाल्याने दीर्घ काल टिकणारा रस तयार होत असावा   व  त्याचे निर्मुलन व्हावयास हवे . 

                बहुतेक सर्व रसाचे मर्म स्वास पटलाच्या  व्यायामा  वर अवलंबून असावे.  हास्य हे जीवनातील खाच खडग्यातून मार्ग काढायचे सामर्थ्य देते . हास्य रस हा सर्व रसांचा मध्यवर्ती रस आहे. हास्य रस सर्व रसांचे वाईट परिणाम नाहीसा करतो. स्वास पटलाची सर्वांगीण कसरत हास्यक्लब मधे  होते . म्हणून हास्यक्लब निर्माण  करणार्याचे कौतुक  करावेसे वाटते. तसेच लयबद्ध तेने हळू रनिंग केल्याने स्वास पाटलाचा चांगला व्यायाम होऊ शकेल.

      जन्मजात स्वभावाची ठेवण एखाद्या रसाशी किंवा २-३ रसाशी संलग्न असू शकते . त्यात हास्य रसाचे थोडे  मिश्रण  चांगले . कारुण्य ,कारुण्य+शांत ,रौद्र, रौद्र+बीभत्स व  भयानक असल्यास घरातल्या व्यक्ती नी काळजी घ्यावी

       हास्य रसाच्या गोष्टी सांगून  हास्य रस अंगवळणी पाडावा . तर ठेवण मध्ये  फरक पडू शकेल 

             नऊ  रसा बद्दल थोड मूळ विषया कडे वळू . एखाद्या कविते  सोबत, ताल  आणि स्वर मिळून जे अर्थपूर्ण संगीत तयार होते त्याला गाणे म्हणतात . गाण्याला भावनाचा म्हणजे  रसाचा गाभा  असतो .  त्यामुळे गाणें मनाला स्पर्श करून जाते

कारुण्य  रसाचे गाणे  मनाला दुखी करून जाते  आणि गाण्याची लय मनाच्या कोपर्यात लपून राहाते उदा: जगी ज्याला कुणी  त्याला देव आहे किंवा  नको देवराया अंत अता पाहू, प्राण   हा सर्वथा जाऊ पाहे…

शांत रसा मध्ये मनाचे हेलकावे  कमी असतात . जणूकाही त्यांना जगाशी देणे घेणे नसते.  अलिप्त वादाकडे त्यांचे वागणे झुकलेले असते . उदा : ए  निल गगन के तले, धरती का प्यार पले ….

अदभूत रस साधारणत: विद्यार्थी दशेत  येतो . एखाद्या गोष्टी बद्दल उत्सुकता वाटणे आणि  विचार मनात घर करून राहाणे अदभुत रसाचे लक्षण  होय . उदा: कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे …

वीर रस  गाणे आपण नेहमी ऐकत असतो. ह्या रसामुळे स्पुर्ती व त्वेष  निर्माण होतो

हास्य रसा ची साठवण विनोदी लोकांमधे प्रकर्षाने जाणवते .एखादा विनोदी प्रसंग दिसला असता पटकन हास्याची उकळी फुटते  हे लोक सर्वांत सुखी असतात संकटांना अलगत पेलण्याची कला त्यांच्यात असते . Running करतांना व खिंकाळ ल्या सारखे हसतांना  चांगला व्यायाम होतो . हास्य क्लब मध्ये इतर रस काळजातून गळून जात असावेत . त्यामुळे हास्य क्लब चे उमेदवार निरोगी असतील

शृंगार रस जीवनाला सोनेरी झालर लावणारा आहे . जगण्याच्या धकाधकीतून राहून  किंचीत विरुंगाळा निर्माण करणारा आहे. युगल गीतामध्ये हा रस भरलेला असतो.

भयानक रस भीतीमुले जी घाबरगुंडी उडालेली असते त्यावेळी भयानक रस तयार झालेला असतो. बराच काळ पर्यंत हा रस टिकून राहू शकतो. घरात एखादा रौद्र रसाचा माणूस असल्यास लहान मुलांना ह्या रसाची लागण होऊ शकते.

बीभत्स रस समाजाला अमान्य असणार्या गोष्टीत सुख वाटण्यात ह्या रसाचा जन्म होतो. हा एक तिटकारा येणारा रस आहे. दादा कोंडकेची बरीचशी द्वार्थी गाणी ह्या रसाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात.

रौद्र रस हा रस हायपर टेन्शन घेणार्या व्यक्तीत त्वरित निर्माण होतो.  ह्या व्यक्ती हट्टी  स्वभाच्या असतात . त्याना explanation देणे आवडत नाही

जीवनातल्या वेगवेगळ्या गोष्टी मुले व वयानुसार हे रस तयार होतात. हे सर्व रस आपले अस्तित्व दाखवून देतात. हास्य, अदभुत, शृंगार आणि शांत रस ह्यांचा जगण्याला त्रास होत नाहि. आणि त्यांचा टिकून राहण्याचा कालावधी कमी जास्त  येतो.

 पण कारुण्य, भयानक आणि रौद्र रस घेऊन जगणारा एखादा शापित आयुष्य  जगात असतो.
                                             पुढील भागात संगीत आणि नऊ रस हे बघू

Comments

Popular Posts