दुरंत उपचार पद्धती

दुरंत उपचार पद्धति 





दुरंत  उपचार पद्धती ( Remote remedies ) :-  परगावाला,  परदेशात असाल आणि जवळचा कोणी  अडचणीत असेल  व तुम्ही त्याची खूप  काळजी करत असाल , तर दुरंत  पद्धतीने उपचार करता येतो .  दुरंत  उपचार वेगवेग ळ्या पद्धती ने करता येतो.

   १) रेकी    २) सिद्ध सायन्स      ३) ध्यान ( Meditation )     ४) दुरंत   साधना

      तुम्हाला आठवते का तुम्ही जे काही विचार करीत असता तेच विचार  जिवलग मित्र / जोडीदार बोलून दाखवित असतो . बहुतेक ह्या गोष्टीचा कोणी पाठपुरावा करीत नाही व फोड करून बघत नाही . हे सर्व beyond echos च्या हालचाली असतात . त्याला भैतिक शास्त्राचा आधार घेण जमत  नाही . खूप पायरी पायरीने ह्या उकलाव्या  लागतील  दोन  मनाची एकरूपता synchronization झाल्याशिवाय  विचार संक्रमण  नाही .

      येथे आपण दुरंत  (4) साधनेचा विचार करू . कारण हि एक अत्यंत सोपी आणि सरळ साधना आहे . सकारात्मक भावनेचा हा एक  परिपाक आहे. येथे परमेश्वरी  सूत्राचा  उपयोग केला आहे.
 
 सर्व  धर्मामध्ये आरती करताना आपण देवाचे गुणवर्णन करीत असतो . आणि त्या मागे त्याच्या शौर्यशक्तीची , कौशल्य शक्तीची , अद्वितीय गुणांची अपेक्षा असते . आपल्याला  आपले काम सिद्ध करून घ्यायचे असते .
       त्याच प्रमाणे आपल्याला ज्या व्यक्ती कडून काम काढून घ्यायचे असेल

           १) त्याच्या विषयी नकारात्मक (negative ) विचार काढून टाकावेत . 
           २) त्याच्या सदगुणा ची list तयार करावी (शत्रू असेल तरिहि. ). 
           ३) त्याच्या विषयीच्या विरुद्ध चर्चा करू नये . 

त्याच्या सदगुणा मधून चांगले ९ गुण चढत्या क्रमाने लिहावेत . तुम्हाला अपेक्षित फळ अनुक्रम ७ किवा ८ मधेनिर्देषित करावे . नकारात्मक , द्वेशात्मक किवा टोचणी लागेल असे लिहू नये .

येथे   दारू ची सवय सोडण्या साठी  एक प्रयोग देत आहे.

         १) रामू तू स्वभाने सर्वात प्रेमळ आहेस आणि तुझे  विचार तत्वाला धरून असतात.
         २)  पूर्वी पासून तू  मेहनतीने आणि हुशारी ने काम करतोस.
         ३) लहान पणा पासून तू सर्वाशी मिळून मिसळून वागत आहेस .
         ४) घरातील सर्वांना तू आवडतोस .आणि तुझ्या बद्दल जिव्हाळा  आहे 
         ५) मागील वर्षी तू केलेली मदत तुझा मोठेपणा सांगून गेली .
         ६)  तुला जरी  थोडी  सवय असली तरी तुला त्याचा कंटाळा  येत  चालला  आहे.
         ७) मागील ३-४ वर्षात तू सर्व अडचणी वर मात करून प्रगती केली आहेस
         ८)  तूला  व्यसनाची किळस येत  चालल्याने या वर्षी तुझा वेळ कामात जाइल व इनकम वाढेल 
         ९) तुझ्या घराचे विचार प्रगतीचे आहेत म्हणून तू गावातील श्रेष्ठ व्यक्ती असेल  

         वरील ९ मुद्दे कागदा वर लिहून घ्यावेत . झोपण्याच्या १५ मिनिटे आधी साधनेला सुरवात करावी . पहिले २ मिनिटे निर्विचार , एकाग्र  बसावे.  नंतर ९ मुद्दे मनापासून वाचावेत . तीन वेळा मना पासून वाचावे . नंतर स्वास घेऊन मधेच ३०-४० सेकंद थांबावे व निर्विचार ध्यान /concentration करावे . व झोपून जावे.

    हि क्रिया लागोपाठ ३ दिवस करावी .पुढे  २-३ दिवस वाट बघावी . तुम्हाला रामू ची रिंग येईल  त्याच्या शब्दाची पडताळणी करून बघा . दर आठवड्याला हि साधना काही दिवस करावि. मात्र वाच्यता  करू नये.









Comments

Popular Posts