कोपरखळी






  कोपरखळी 


मनातील पाकळ्या तुझ्या  हळूच  उघडल्या
चुकुनी स्वप्नांच्या खोल्या उघड्या पडल्या

      चुंबनाच्या  जोड्या तिथे कित्येक  सापडल्या
      घट्ट पणा बघुन त्यांना  खिशात लपविल्या

वेळी अवेळी कोठे वाटेतील विरुंगळा
जमेल तेव्हा मिळत नाही काही चघळायला

      दुसरे तिसरे हेवे दावे सगळे नकोसे वाटले
      आरशातील नखरे तेवढे बरे भावले

आरशात असते तसे बरेच काही लपले
तेवढे मात्र वेगळे सगळे जपून ठेवले

         माहेरील मैत्रीणी  वाटल्या नट्या  जश्या
         दाखविल्या नाहीत त्या अजून कश्या ?

नकोस करू पाठलाग पडशील तोंडघशी
उचलावे लागेल सगळ्या सामानानिशी

          भेट पहिली कोणत्या शिल्पात ठेवली
          असेल मोठ्या पेटारात सवे कोंबली 

Comments

Popular Posts