जीवनातील नऊ रस भाग --२

जीवनातील नऊ रस भाग --२

संगीत आणि जीवनातील सांगाती







    जीवनाच्या वाटेवर  लहान मोठी खाच खडगे असतात.  वाटचाल करतांना इच्छा नसतांना मार्ग बदलावे लागतात. हे सर्वांच्या जीवनात घडत असते . ह्या सर्कसिच्या  कसरती मध्ये तोल सांभाळणे अत्यंत गरजेचे असते.
      येथे संगीत हे तुमच्या जीवनाचा सांगाती(सोबती) होण्यास तयार असते. तुम्ही फक्त सकारात्मकतेचा हात पुढे  करा.
       वर उल्लेखिलेल्या परिस्थितीने मन एखाद्या ठिकाणी अडकुन पडते आणि नऊ रसा पैकी कोणत्या तरी एका रसाचा जन्म होतो.
   
        तुम्ही सावध असाल तर कारुण्य, रौद्र , भयानक व बीभत्स रसा पासून स्वत:ला सावरू शकाल व आनंदी राहू शकाल. ह्या  चार रसा मध्ये माणूस अडकला आणि त्या रसाची वाढ होण्यासारखी परिस्थिती असली तर केविलवाणी स्थिती होते. सहनशिलतेच्या क्षमतेवर  सर्व अवलंबून असते. हास्य रसाचा उपाय घेतल्यास फायदेशीर होइल हि . येथे आपण रसाचे संगीताशी असलेले  नाते बघत आहोत.

        कारुण्य रस प्रधान व्यक्ती स्वत:ला दोषी ठरवून नैराश्याचे गर्तेत स्वत:ला ढकलून देत असतो. इतर रस कालांतराने गळून पडतात पण कारुण्य रस खूप चिवट असतो असे दिसून येते. जगातले दुख: स्वतावर ओढवून घेऊन भोग म्हणून भोगत बसतात. संत व भक्त मंडळी हे पण  दावेदार आहेत.

     तुम्ही  एखाद्या काळजीत असाल तर कोणतेतरी गाणे आठवण्याचा थोडा प्रयत्न करा. थोड्या वेळाने एक विलोभनीय गाणे आठवेल . त्याचे आवर्तन करावेसे वाटेल . बस तुमच्या काळंजीवर गुरुकिल्ली सापडली म्हणून समजा. आणि तुमच्या जीवनात हास्य फ़ुलेल. त्या अनुसघाने चहु  बाजूचे वातावरण हर्षभरित होइल. ह्या गोष्टीचा प्रभाव घरातील सर्वांच्या चेहर्यावर दिसेल. जरी एखादे कारुण्य रसयुक्त गाणे तुम्हाला भावले असेल तरीही अन्तकरणातिल नीरवता चेहर्यावर येइलच.

     मन आणि बुद्धी (मेंदू) यांच्या क्रियेने योग्य असे रसयुक्त गाणे आठवू शकते. ते विपरीत रसावर उपाय आहे असे लक्षात येइल. तुम्हीही पाहिले असेल कि गाणे गुणगुणत असणारा नेहमी आनंदी, खेळकर, चोखंदळ आणि परिस्थितीशी हसत खेळत सामोर जाणारा असतो. 

Comments

Popular Posts