मनुष्य जन्म


मनुष्य जन्म

मनुष्य जन्म

मनुष्याला जन्म कसा मिळतो? त्याने विशिष्ट घराची निवड केलेली असते जेथे राहून त्याच्या अपेक्षा पूर्ण होतील , त्याला  जे काही प्राप्त करून घ्यायचे आहे त्यासाठी  वातावरण आहे कि नाहि. जरी असले तरीतरी त्या वंशाचा होकार  आहे कि नाही .  जरी होकार मिळाला तरी तो वंश जे दु:ख भोगत आहे त्याला   पुरे  पडण्यासाठी   पुण्य जमा आहे कि नाही सर्व  हे करून

   माणूस जन्म घेतल्या पासून बंधनात बांधला गेलेला असतो .



पहिले बंधन तो ज्या घरात जन्म घेतो त्यांचे ऋण  त्याने  मान्य केले असते कि यांचे जे काही कर्म रूपाने देणे शिल्लक राहील त्याला मी बांधील रहिल. आणि तसा जरूर प्रयत्न करिल. त्या घराचा मात्र तसा आक्षेप नसतो . आई वडील स्वत:चे गाठोडे बगलेत घेऊन तयार असतात. पण पितरा  कडून मिळवलेली परवानगी मागील अभिलाषा राहतेच.

 दुसरे बंधन त्याने पूर्व जन्मी जे काही सोबत आणले असेल ते निस्तरवीणे

तिसरे बधन ह्या जन्मात जे काही उणे अधिक हिशोबात असेल

चौथे बंधन नराचे नारायण होण्याचे वचन. (मी तुझा पुत्र आहे आणि मी ते सिद्ध करीन).

ह्या आत्म्याचे येणे वंशाच्या व संसाराच्या  दृष्टीने कल्याण कारी असणार कि नाही हे जगन्मातेलाच कळते . सार्या  मायेचा बाजाराची मालकीण तीच आहे.


  तो  तेरा सार हु भगवान  तू ही मेरा मान  मुझे  तेरा अभिमान
तू हि मेरी मैया   तू हि मेरा सैया  तू हि तो है प्यार भरा आसमान

        पूर्ण परवानगी मिळाल्यावर आत्म्याचा शिवणी  तून प्रवेश होतो . सोबत आणलेल्या गाठोड्याचे  छोटे छोटे सात गाठोडे तयार करतो.  मनुष्य जन्मात जे कष्ट भोगावे लागतात तेवढेच गर्भ काळात आत्म्याला भोगावे लागतात . ते सर्व गाठोड्यातील  भोगाच्या सवेदानांमुळे . जिवंतपणी सुद्धा माणूस पापाच्या ओझ्याने हैराण होतो .
                                  एकूण वजन १०० किलो धरले तर सर्व साधारण माणसांचे भोग मापन

१) मूलाधार :-      राग , द्वेष, मत्सर , बदला, मोक्षा विरुद्ध प्रपंच वाढवणे ,-------३५
२) स्वाधिस्ठान :- स्वार्थ , मोह, मद,  हव्यास ,अहंकार , उग्र , राक्षसी ----------१०
३)  मणिपूर :-      पसंती, व्यसन, तोरा , खादाड , हावरट , बेशिस्त,भय  -------२०
४) अनाहत :-      प्रेम , जिव्हाळा, आपुलकी , कारुण्य ,भाव , क्षमा ,दया ,पैतृक  ऋण ----१०
५) विशुद्ध :-        निरपेक्ष, निर्मल,शुद्धता ,स्वच्छ , विराग ,नितळ ,त्याग ,दान, -------------१
६) आज्ञा :-          सद्बुद्धि , विवेक ,निरीक्षण, तपास , चाळणी , आज्ञा,-----------२०
७) सहस्र्त धारा :- मातृ  ऋण , नर नारायण ऋण ,मोक्ष ,वैराग -----------४



पहिले ओझे खूप मोठे असते   ते मूलाधार चक्रावर टाकून दिल्याने आत्म्याला बरेच  हलके  वाटते . जस जसे आत्माचे संक्रमण पुढे पुढे जाते त्या  प्रमाणे त्या भोगातील त्रीव्रते अनुसार आईच्या स्वभावात त्रीव्रता उमटतात . त्या साठी गर्भातील शिक्षण हे नियम पाळावेत .

आज्ञा चक्रावर आल्यावर सहस्त्र धारावर ४ किलो फेकून देतो व आत्मा भ्रूमध्यावर स्थित होतो . पण आत्मिक आनंदाची जाणीव काळजात जाणवते. विशुद्ध चक्रावर आल्यावर आत्मा प्रत्येक गोष्टी बद्दल  क्षमा मागतो.

बहुत करून १ ते ४  चक्र सुख ,दु:ख , भोगाशी निगडीत असतात . त्यासाठी ध्यान , रेकी किवा सिद्ध सायन्स द्वारे उपचार करता येतात . आईच्या प्रेमळ हात पाठीवरून कमरे पर्यंत  फिरल्यास रेकी शक्ती  मिळू शकते.

 मूलाधार पासून सहस्त्र धारा पर्यंत आत्म्याला ६  चक्र लागतात . मणिपूर चकावर आल्यावर स्त्रीला डोहाळे लागतात .

  जे पुण्यवान , साधू संत वृत्तीचे असतात ३ च्या  पुढील चक्रात  तुलनात्मक जास्त वजन असते ते  अधीभौतिक समृद्धी  प्राप्ती साठी जान ची बाजी  लावतात  . ४ च्या खालील भागात जास्त असल्यास  भौतिक समृद्धी  प्राप्ती साठी जान ची बाजी  लावतात   .

====================================================
 गर्भ राहिल्यावर रोज सकाळी ७-८ वाजता व संध्याकाळी ७-८ वाजता गर्भाला शिक्षण द्यावे .
बाळ गर्भात असतांना त्याला शिकवता येते . येथे विस्तृत पाने दिले आहे. बाळाचा मेंदू आणि मन आईशी भावनिक संयोगानी एकरूप असते . आईशी भावनिक माध्यमातून तो शिक्षण घेऊ शकतो . तसेच आसपास असलेले व्यक्ती सुद्धा भावनिक भाषेत बोलून शिकवू शकतो.

  शिकविलेली माहिती भावनिक  लयतेच्या  स्वरूपावर आरूढ होऊन मेंदूला मिळत असते . तेथे ती वेगळी करून स्मरणात ठेवली जाते . पती पत्नी यांनी भावनिक स्तरावरील उच्चारलेले हुंकार स्वरूपातील प्रेमळ एकरूपतेचे  स्वर गर्भातील बाळाच्या शिक्षणासाठी उपयोगी येतात . ह्या स्वरामध्ये घरातील बहिण भाऊ आजी वैगरे  बाळाला शिकवू शकतात . काही धार्मिक पुस्तके वा तत्वाची पुस्तके वाचू शकतात . जसे

१) अच्छा जीवन कैसे बना सकते है.--धार्मिक,ज्ञानी ,सज्जन,तत्वज्ञानी ,दानशूर, कर्मिष्ठ  , कृपाळू,मार्गदर्शक
२) चांगले गुण कोणकोणते?---चपळता , हुशारी ,दयाळू, क्षमाशील , उदार
३) प्रसिद्ध व्यक्तित्व ---- कवी, गायक , शास्त्रज्ञ ,लेखक,
४) शारिरिक प्राबल्य --खेलाळू, बलवान ,गतिमान ,प्रसन्न , धीट , प्रौढ , देखणा

        तुझ्या मध्ये खूप चांगले ------------ गुण आहेत . ( वर म्हटलेल्या गोष्टी पैकी पाहिजे त्या गाळलेल्या जागी  भरुन म्हणाव्यात )

गणपती व सरस्वती आरती म्हणावी . आईने ऐकू येईल असे बसावे .

१) तू होतकरू आणि हुशार  आहेस ------------------- चाणाक्ष आहेस.
२) तू सर्वांवर प्रेम करशिल. --------------------------तू प्रेमळ आहेस
३) तू अभ्यासात लक्ष घालुन प्रवीण व पंडित होशील .--- तू अभ्यासू व हुशार आहेस
४) तू शिक्षणाने गरिबांना व अडचणीत असणार्याना मदत करशील ---तू धेय्यवादि आहेस
५) तू घराण्याची व समाजाची प्रगती करशिल. -----तू  पराक्रमी आहेस
६) सौजन्य शीलता हा तुझा धर्म असेल ------------- दयाळू आहेस
७) तू ज्ञानाच्या  प्रकाशाने  जगात शांती निर्माण करशील --- तुझ्यात राजाचे गुण आहेत

   सदर १०-१५ मिनिटाचा कार्यक्रम करावा .

गर्भाशी वडिलांनी व इतरांनी आपुलकीने गप्पागोष्टी कराव्यात  . आईच्या काना द्वारे व मनाद्वारे बाळा  पर्यंत बोलणे पोहोचते . आईच्या मनात नेहमी सकारात्मक विचार राहतील याची काळजी घ्यावि. तिला भीती वाटु देऊ नये.  , ,अपमानास्पद वागणूक देऊ नये  ,  आईला धीट वाटेल असे वातावरण ठेवावे

खालील महापुरुषांचे चरित्र वाचावयास हरकत नाही-- महात्मा गांधी ,महात्मा फुले , बाबासाहेब आंबेडकर , रवीन्द्रनाथ टागोर ,जमशेटजी टाटा , सचिन तेंदुलकर

युद्धाचे व सन्याशी शिकवणीचे ग्रंथ ऐकू नये .
घरात तणावाचे वातावरण करू  नये .

Comments

Popular Posts