औषधी विना रोग निवारण
औषधी विना रोग निवारण
आपल्या शरीरात निसर्गात: रोगनिवारण पद्धती कार्यान्वीत असते. तिचे कार्य आवशकतेच्या क्रमानुसार ( priority ) हाताळले जाते. परंतु निसर्गाशी एकरूप न राहिल्याने, नियम न पाळल्याने किंवा चिंता, व्याप, संकट ह्यामुळे अडथडे निर्माण होतात व त्याची लक्षणे रोगाच्या स्वरूपात दिसते. काही बाह्य उपचारांनी म्हणजे औषधे घेऊन त्यावर मात करता येते.
यावर काही उपाय पूर्वीपासून व्यवहारात वापरले जातात. कर्णफुल, बिगबाही , नथ , नाकातली फुली व कंगण , कडे , अंगठी अलंकार रुपात वापरले जातात. हे सर्व acupressure मधील reflexology चे बिंदूच्या जागा आहेत.
बरेच आजार औषधे घेऊनही जीर्ण स्वरुपात रुपांतरीत होतात व आयुष्यभर औषधे घेऊन जगावे लागते. विना औषधी काही योजना येथे देत आहे. १) प्राणायाम २) acupressure ३) हास्य क्लबचा प्रयोग ४) रेकी ५) रनिंग वा मोर्निंग वॉक ६) मुद्रा विज्ञान . हे उपाय आजाराला तर दूर ठेवतीलच पण पूर्ण बरे करू शकतिल.
Acupressure ( Reflexology ) बद्दल येथे थोडे सांगणे योग्य वाटते . आपल्या शरीराचे अवयव तळ हात, तळ पायावर प्रतिबिंबित झाले आहेत. मनगटावर जनन संस्थेचे बिंदू असल्याने हातात व पायात कडे, बांगड्या, कंगण घालण्याची प्रथा भारतात आहे. मानसिकते संबंधी लवचिकता मनगटावरील बिन्दुंशी निगडीत असते.
दुखणार्या बिंदू वर एक मिनिट पंपिंग ( दाबणे व सोडणे ) दाब दिल्यास आजाराचे निर्मुलन होऊ शकते. थोडे दिवस २-३ वेळेस उपचार केल्यास दुखणे कायम स्वरूपी मावळू शकते. तळ हातावरील व तळ पायावरील प्रतिबिंबित झालेले बिंदूवर उपचार केल्यास त्वरित परिणाम दाखवितात व रोगाच्या मुळावर उपचार होतो. त्यासाठी खूप अभ्यास करण्याची गरज नाहि. दाब देण्याची क्रिया हाताच्या अंगठ्याने करावयाची आहे. अंगठ्याचे नख अर्धा mm असावे.
सोबत दिलेल्या चित्रावर अवयवाची नावे व ग्रंथींची नांवे दिलेली आहेत. मोठ्या रोगावर acupressure चा चांगला परिणाम दिसून येतो. उदा:- १) हार्ट attack ची सूचना २) मधुमेह ३) किडनी स्टोन ४) पाठ व गुढगे दुखी ५) स्त्रियांचे mc व इतर प्रोब्लेम ६) अपत्य प्राप्ती संबधी ७) दमा ८) शौच व मुत्र विकार ९) रक्त विकार वैगरे .
साधारणत: accupressure चे कार्य असे असावे. दुखणारा बिंदू निर्देशित अवयवाचा बिघाड दर्शवितो. त्यावर दाब दिल्यास मेंदूच्या विशिष्ट केंद्रास संकेत जातो. बिघडलेल्या अवयवातील त्रुटी अनुसार योग्यते औषध वेगवेगळ्या ग्रन्थि द्वारे करून पुरविले जाते. इतके बिनतोड औषध मिळणे अवघड आहे.
नियम :-१) एखादा बिंदू नुसता दाबुन ठेवू नये , पंपिंग करावे
२) एखाद्या बिंदूवर दोन मिनिटां पेक्षा जास्त काळ पंपिंग करू नये.
३) दाब सहन होईल एवढाच द्यावा.
4) उपचाराच्या शेवटी बिंदू क्र १६ व २६ वर दाब द्यावा
4) उपचाराच्या शेवटी बिंदू क्र १६ व २६ वर दाब द्यावा
Comments
Post a Comment