स्वप्नात विहरताना


                                                                           स्वप्नात विहरताना



स्वप्नात विहरताना

ह्या बेधुंद फुंद मनाला वेळीच कसे  आवरावे
अंतरीच्या भावनांना नुमजे कसे सावरावे

अलगद फुललेल्या पाकळ्यांना  वाटे फुन्करावे
बघुनी निरागस मुखचंद्र परी मनात साठवावे

नयनांच्या कुशीत झोपल्या स्वप्नाच्या परी  कल्पना
जागे करुनी त्यांना  कशा   करू  वल्गना

नाजूक कुशीत घेउनी   बाहूत  द्यावे विसावे
केसात गुम्फुंनी जाळे मेघांना  ओढून घ्यावे

खुदकन गाली हसेल तेव्हा हृदयाशी आवळावे
मुखा वरील सौंदर्य  लहरी मनसोक्त ते टिपावे

श्वासात स्वास मिसळूनी  स्वप्नात परी रमावे
 नाजूक भावनाना  बळे  जबरी न कुस्करावे

जागे होतील स्वप्ने त्याना मंद मंद कुरवळावे
 गाली हात ठेउनी सह श्वासात  सूर धरावे

घट्ट धरून प्रियेला आकंठ चुम्ब  चुम्बावे
 हे सूत्र ना आकळे, कधी कधी न संपवावे

Comments

Popular Posts