निसर्ग साधना

निसर्ग साधना 




निसर्ग साधना :- आपण निसर्गाच्या सानिध्यात राहून त्याच्या आदेशा प्रमाणे वागत नाहि. ह्या साधनेने जगण्यात वेगळे पणा तर जाणवेल पण त्याव्यतिरिक्त निसर्गाशी एकरूप झाल्याची संतुष्टता हि मिलेल. त्याकरिता थोड्या काला पुरती आपण  आपली व्यग्रता विसरा.

         तुम्ही इतर प्राण्या प्रमाणे एक प्राणी आहात अशी  कल्पना करा . कल्पना  यासाठी करा कारण आपण तसे मानत नाही कि आपणही  प्राणी आहोत.  इतर प्राणी गट एकमेकाशी कसे वागतात तशा कल्पनेने वावरा. हि साधना करतांना तुम्ही दाट झाडीच्या रस्त्याने जेथे प्राणी पक्षी यांचा वावर असेल अशी जागा निवडा .  येथे तुम्हाला १५ ते २० मिनिटे तरी घालावयाची आहेत. तो एखादा रस्ता असल्यास उत्तम



         वाटचाल करतांना इतर सर्व विचार विसरा. वृक्षांकडे लक्ष देऊन बघा. त्यांच्या पानांचा आकार, गडद हिरवे  पणा , पक्षांचा विहार, पक्षांचा किलबिलाट, ह्या सर्व गोष्टी जणू तुम्ही  पूर्वी  पाहिल्याच नाहीत आणि आता प्रथमच पाहात आहात अशी कल्पना करा . त्यातील माधुर्य मनात समाऊन घ्या  हे जीवन वेगळ्या नैसर्गिक पद्धतीने जगत आहोत . हळू हळू एक एक पाउल पुढे पुढे चला . बालपणी च्या आठवणीचे मिश्रण केले  चालेल . तुम्ही जितक्या त्रीव्र तेने  हि  साधना करणार तितके तुम्हाला आल्हाद दायक relax वाटेल .

  आता चहु  बाजूला असलेल्या निसर्गाचे तंतोतंत सौंदर्य टिपू या . जसे एखाद्या Humming Bird ला फुला बद्दल वाटत
       उदा:- १) हा निळ्या जांभळ्या रंगाचा मोर किती छान आहे .  जवळ गेलो तर तो उडून जाइल. लांबूनच त्याचा पिसारा बघुया .  सरू च्या झाडावर दोन खारी खूप गोंधळ करीत आहे. आपण आता तिकडे जाऊ या . अरे ह्या खारी तर लपंडाव खेळत आहेत ?  हे सर्व काही पूर्णत: नवीन वाटत आहे  .  हे पूर्वी कधीच पाहिले  नव्हते .

                २) बदामाच्या झाडाने आपल्या  जाड पानाच छत किती विस्तारून ठेवलं आहे. स्वत:ला खूप गर्भश्रीमंत समजतो वाटत . वडाच्या झाडाशी स्पर्धा करतोय.  पक्षांची ह्याच्याशी मैत्री आहे अस दिसते

                 ३)  हे चार पाच बगळे गायीच्या मागे मागे का पाठलाग करीत असतील ?

 ह्या दृश्याची आनंदाची शिदोरी जपून ठेवा . मनाला निसर्गाच्या शिदोरीचा आल्हाद स्पर्श निसर्गाच्या कुशीतील वात्सल्य जाणवल्याशिवाय राहात नाहि. मोह माया माणसाला किती गुरफटून टाकते ?


          एखादा प्राणी दुसर्या प्राण्या बद्दल, पक्षा बद्दल व वृक्षा बद्दल काय विचार करत असेल याची कल्पना करा.

चिंता, व्याप, हायपर टेन्शन  या पासून सहज सुटका  करता येईल

Comments

Popular Posts