आत्म्याचा प्रवास
आत्म्याचा प्रवास
आत्म्याचा प्रवास :- थोड रूपकात्मक सांगितल्या शिवाय पूर्णत: अंदाज घेता येत नाहि. हेच सूत्र पुराणात वापरले आहे. आपण थोडा त्याचाच आधार घेऊ या .
एक मोठे जहाज अनेक वर्षा पासून प्रवासाला निघाले होते. सर्व प्रवासी एक दुसर्याला परिचित होते. लांबच्या प्रवासामुळे त्याच्यात आत्मियता जिव्हाळा प्रेम नांदत होते. जहाज म्हणजे एक आनंदाचा सोहळाच होता जणू .
सर्वांना माहित होते कोठे जायचे ते. बर्याच दिवसा पासून एखाद छोट बेट लागले नव्हते. एखाद्या बेटावर थोड थांबावं असा सर्व प्रवाश्यांना वाटत होत. सर्वांना विरंगुळा हवा होता. समुद्राच्या लाटांच्या पलीकडे एखादा दीपस्तंभ किंवा निशाणी नजरेस येत नव्हते. थोड्या वेळाने सर्वाची प्रतीक्षा संपली .
लांबवर एक बेट नजरेस पडले . हर्षाचा मोठा डोंब उसळला . प्रत्येक जण मजा कशी करायची याची योजना तयार करू लागले. पण जस जसे बेटां जवळ पोहोचले तसे एक लक्षात आले कि बेटावर मृगजला सारखे, प्रतिध्वनी युक्त , पारदर्शी वातावरण आहे. सर्वजण विचारात पडले .
तेवढ्यात एकाने शक्कल लढवली .वेश धारण करून तो बेटावर उतरला . वेश षड्रिपुच्या धाग्यांनी बनविला होता . थोड्या वेळाने वेषाची त्रीव्रता बोचू लागली . जोडीने उतरल्यावर सोशेल अशी मधुरता आलि. बस एकेकाने जोडीने उतरायला सुरवात केली . हात/साथ सोडल्यावर मात्र वेश जास्त बोचत असे. बरेच जहाज रिकामे झाले . ज्याना धेय्याला पोहोचण्याची घाई होती ते थांबले . काही स्वत:च्या जबाबदारीने एकटेच उतरले.
प्रत्येक जोडीने बेटावर मौज मजा करायला सुरवात केली . प्रत्येकाला एकमेकांच्या डोळ्यात विश्वदर्शनाची/ धेय्यापुर्तीची प्रतिमा दिसून आली . काहीना वाटले हेच ते दर्शन जे आम्ही शोधत होतो . आणि …पुढे प्रपंचाला सुरवात झाली . संसाराच आकर्षण वाढत गेल . निसर्गाने कुशी बदललि. पशु पक्षी प्राणी झाडे झुडपे वेली आल्या. इंद्रधनुश्याने ढगांना ओढून आणल . जहाजाचा चालक चक्रावून गेला . त्याने परमेश्वराला निरोप पाठविला आणि पृथ्वीवर नवीन विश्व तयार झाल्याच सांगितलं .
प्रपंचाला सजून नटून सुंदर आकार आला . आप आपसात स्पर्धा सुरु झाल्या . श्रेष्टत्वाच मोजमाप सुरु झाल. अहं पणाचा दम्भ वाढत चालला. हेवे दावे सुरु झाले . श्रेष्टत्वा पोटी एक दुसर्याला पाण्यात पाहू लागल. गरीब श्रीमंत असे गट पडले. भौतिक तेचे इमले उभे राहू लागले .
नवनवीन क्षेत्र तयार होऊ लागली . नवरंगी दुनिया स्थापन झाली मोहाचा आवेश वाढत चालला . आपले अस्तित्व टिकविण्या साठी नवीन क्लुप्त्या चा शोध लावला. प्रेम सागरात डुबुन जहाजा वरील सवंगड्या ना आमंत्रण दिले . परमार्थ सोडून प्रपंच वाढविला . थकून भागून गेलेले आत्मे जहाजावरून नवीन ड्रेस घालून हातात घेतलेले काम पुन्हा पुढे नेऊ लागले. थकल्या भागाल्याची जहाजावर लाइन लागू लागली . पाप पुण्याची जंत्री नुसार वेश वाटप होऊ लागलि.
धेय्याची, जहाजाची खोटी आठवण काढून देवालये उभारू लागलि. धेय्यपुर्तिच्या मुर्त्यांची आराधना करू लागले . खोटे पणाला कंटाळून काहींनी सन्यास घेतला, काहींनी शंकराचार्यांना गुरु मानून स्वत:ला जाळून घेतले आणि काहींनी मोहिनी वस्त्र त्याग करायचे ठरविले . जहाज सर्वाना सोडून जाऊ शकत नव्हते म्हणून छोटे छोटे गट करून त्यागी आत्म्यांना वेगवान छोट्या बोटीत पाठवु लागले. त्यांचा मोक्षाचा मार्ग मोकळा झाला. बाकी मोह आवरत नव्हता म्हणुन बेटावर भजन करत बसले त्यांचीच वंश वृद्धीचे आपण एक पाइक ….

Comments
Post a Comment