अबोली
अबोली
बिन शर्त जाहली अबोली
अट नाही कशी त्या घातली तू तरी
वाद नसे जरी हा तसा
जीवा करी वेडा पिसा खोल वरी
पैजेत पैज तुझी जिंकली
प्रीतीची नगरी लुटली कितीतरी
प्रीतीनेच मिळाले जीवन
तुज संगे रम्य हे जीवन ह्या अटी
तुज मुले जीवनी रमलो
प्रीतीच्या बाहुनी तरलो ह्या अटि
जीवात जीव घालूनी
प्रीतीचे दाणे वेचुनी ह्या ओठी
स्मित कोवळे गालावर
मावळे ओठाच्या तीरावर कधीतरी तुज बघुनी
Comments
Post a Comment