फुलपाखरू
फुलपाखरू
लतेच्या कडेवर इवली
होती कळी देखणी एकटी
लुकलुकत्या इवल्या नयनी
एकटक दृष्टी लाउनि सारखी
उल्हासे हसून गाली
लाडिक गळ घातली लते ला
फुलपाखरू हवे नटवे
रंगीत शालुंचे हवे ठिपके पंखावरी
शोधती तरी गावेना
जे चित्ती ते दिसेना प्रयासे
भाबळे चित्त लागेना
उचंबळून येई मना सारखे
लोचने शोधती इथे तिथे
लाज लोपली तमा नसे यावेळी
पाखरू हवे ते दिसले
पंखावरी गहिरे नखरे त्याजला
दिसताच ते झेपावले
कळी कंठी कर वेढले आलिंगुनी
पाकळीत मुख लपवूनी
चुंबले त्याने लवूनी तिजला
गुलाल फुलले ओठी
गुदगुल्या झाल्या देठी तिजला
हि तृष्णा प्रीतीची गहरी
वणव्यात विझवी जहरी तृष्णा
ओसंडला आनंद गगनांत
वेढू नी त्या सार्या वनात भिनला
Comments
Post a Comment