शिल्पकार
शिल्पकार
ओसाड तरु भूवर शांती सूड गायी
शांतीत प्रीत लहरी कंपित शील येई
वेचुनी वेदनेला चुंबितो एक वेडा
सुप्त शक्ती कराशी अर्पितो काळी शिला
कल्पून शिल्प त्याना लीम्पित प्रीत जोडी
धुंद नभी पर्यांना गुंगून तोच सोडी
लोचनी दिव्य ज्योती स्पर्शुनी स्थिर होई
कण हि घन खाती मूर्तीत गीत येई
संचारली तनु जंगी अति भव्य इर्ष शक्ती
तुंग शिखरी अंगी कोरुनि मूर्ती होती
शिल्पकार मनीच खुलला प्रतिमाच जिवंत झाली
प्रसन्ने मनीच खुलला हर्षा अंतरी झुलली
गुंफीत भावनांची मनी गुपित ती माला
मुखी रंग पर्याचा गमे प्रेम भंग झाला
क्षणीच लक्ष गुंगिले धुंदी चर्र जळाली
अंतरीचे मूर्त निमाले सामोरी ती बैसली
प्रीती भंग जानवे मुखी त्या पर्याच्या
आनंद त्यासी द्यावे चुंबितो कळ्या ओठांच्या
भावनाच जिवंत झाली चुम्बुनी वेदनेला
मुसमुसला त्याच ठायी कवटाळूनी प्रीत बाला
Comments
Post a Comment