हरिणी




हरिणी 

त्या लटा, भालीच्या बटा , येऊ दे जरा गाली
गमे मेघ वेढले सकाळी

त्या किनारी , नयनांच्या तीरी , नाच ओढू नजर तीरा
भेदिल हृदय फिर जा

ती खळी , गालीची गुलछडी ,भालू दे तव स्मिता
करून प्रिया अगतीका

त्या कळ्या ओठांच्या घर गड्या ,घेउनि जरा गाली
फास ती ओठी प्रेमाली

प्रेम वेल्हाळे ,हृदय विव्हाले, नाच राहू उभी नजरी
बावरे प्रीत अंतरी

झोंबरे, गालिचे प्रीत वारे, नाच फुगवू गालिचा रुसवा
हा बेत तुझा फसवा

Comments

Popular Posts