आखाजी
आखाजी
आखाजिच्या हिंदोळ्यावर मन माझे रे झुलते
भाऊ बहिणीच्या संगती पाखरू मनाचे गाते
माहेरची वेडी माया ओढ इकडे तिकडे
हंबरती आठवणी ध्यान लागेना कुणीकडे
पिंपळाच्या पानावर रेषा दिसती भारी
प्रीती सख्या तुजवर दाटल्या जाळी परी
सख्या ये लवकरी माहेरीला कंटाळले
पारम्ब्याला बिलगून वाट तुझी रे पाहाते
आमराइच्या छायेत झुळूक लागे आल्हाद
याद सतावते सख्यारे रातीच शिरतेरे वार
ओढ्याच्या काठावर बसले पाय टाकून
थेम्बाथेम्बातून गारवा उबवतो घामेजून
Comments
Post a Comment