आगगाडी
आगगाडी
कुणिकड घाटाकड चालली बया
ठसक्यात ठुसक्यात चालली गावा
डोंगराळ झाडीझुडी लागती वाटे
झोंबती झुंजूमुंजू गारगार वारे
डोलती हि झुलती हि झोपती प्रवासी
खोळम्बलेलि पेगुळलेलि डोलती डोकी
चेकाटती भेकाटती बारकी पोर
चोपाटती धोपाटती मायेच्या म्होर
नकटीच्या नखर्याला नाक नका मोडू
प्रवासात उण पूर नका बुर मानु
ठेसनात धसक्यात थांबली गाडी
ढोसुन ती दारा वाटे लोकांची लोन्ढी
कोंबाकोंबी डब्यातही काठोकाठ भरे
झोंबाझोंबी सामानाची ठेवण्यास चाले
ढोपरात वाकातांत म्हातारी खोड
खोकतात खेसकुन सरका थोड
धांगड धिंगा तांगड तिन्गा वाजे नगारा
गीरामिट तिरकीट चाके गरा गरा
Comments
Post a Comment